अकोला, 6 सप्टेंबर (हिं.स.)।
तब्बल १३२ वर्षाची परंपरा असणाऱ्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेश विसर्जनाची मिरवणूकीचा प्रारंभ जयहिंद चौक येथून सकाळी राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्या हस्ते महाआरतीने झाला.
यावेळी आमदार अमोल मिटकरी, आमदार साजिद खान पठाण, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, माजी राज्यमंत्री डॉ रणजीत पाटील, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंग मोहता, कार्याध्यक्ष हरीश अलीमचंदानी, संग्राम गावंडे यांच्यासह श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
अकोल्यातील मानाचा पहिला गणपती म्हणून श्री बाराभाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ओळख असून त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. विसर्जनाच्या दिवशी महाआरतीनंतर भव्य मिरवणुकीची परंपरा आहे.
कामगार मंत्री तथा पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते पूजन व महाआरती झाली. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी हजारो गणेश भक्त उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे