सोनाई इंटरप्राईजेस या बॅग बनविणाऱ्या लघुउद्योगाचे आ. जैस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, 4 सप्टेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर शहरातील जटवाडा रोड परिसरातील सोनाई इंटरप्राईजेस या बॅग बनविणाऱ्या लघुउद्योगाचे उदघाटन छत्रपती संभाजी नगर मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते पार पडले. याव
आमदार


छत्रपती संभाजीनगर, 4 सप्टेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर शहरातील जटवाडा रोड परिसरातील सोनाई इंटरप्राईजेस या बॅग बनविणाऱ्या लघुउद्योगाचे उदघाटन छत्रपती संभाजी नगर मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी उद्योगाला शुभेच्छा देत उद्योजकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.याद्वारे अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे विशेष नमूद करून, महिलांच्या स्वावलंबनाच्या या उपक्रमाचे आमदार जैस्वाल यांनी अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande