लातूर, 4 सप्टेंबर (हिं.स.)।
ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्या वतीने आयोजित 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ या उपक्रमासाठी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते.
ग्रामविकास व पंचायत राज विभागाने आखलेले हे अभियान हे खरं तर ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा आहे.
या माध्यमातून सुशासनयुक्त पंचायत, ग्रामविकासाची सेवा समग्रता, लोकसहभागावर आधारित विकास, स्वच्छ व हरित ग्राम, मनोरंजन व इतर जीवनोपयोगी सोयी, सक्षम पंचायत वित्तीय स्वावलंबन, तसेच आरोग्य, शिक्षण, सामाजिक बांधिलकी या सर्व घटकांचा संगम साधण्यात येणार आहे.
या अभियानाचा विशेष भाग म्हणजे स्पर्धा व पुरस्कार योजना. राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर स्पर्धा घेऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना कोटी रुपयांच्या निधीने गौरविण्यात येईल. हा सन्मान म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही, तर गावांच्या प्रगतीसाठी प्रेरणा आहे.
प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपजिल्हाधिकारी श्रीमती मंजुषाताई लटपटे मॅडम, गटविकास अधिकारी पंकज शेळके, प्रदेश सरचिटणीस शिवानंद तात्या हेंगणे, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, सर्व सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ, अधिकारी, महिला भगिनी, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis