सोलापूर, 4 सप्टेंबर (हिं.स.) : सुशीलाबाई शांतप्पा बिराजदार (वय ६२, रा. बिराप्पा नगर, ता. इंडी) या घरातून वॉकिंगला जाते म्हणून जाते म्हणून घराबाहेर पडल्या. एका वाहनात बसून त्या टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) येथे आल्या.
त्याठिकाणी उतरून त्यांनी भीमा नदीच्या पुलावरून पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. त्या मानसिक आजारी होत्या. त्यांच्यावर सोलापुरातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना दहा वर्षांपासून तो आजार असून त्या नैराश्यातूनच त्यांनी पाण्यात उडी मारून आत्महत्या केली, असा पोलिसांचा अंदाज आहे. मयताचे नातेवाईक श्रीपतीगौडा जनभसप्पा बिराजदार (वय ७३, रा. बीरप्पा नगर, ता. इंडी) यांनी पोलिसांना या प्रकरणी माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड