समृद्ध पंचायत राज अभियानातून ग्रामविकासाची गती वाढणार - पालकमंत्री गणेश नाईक
पालघर, 4 सप्टेंबर (हिं.स.)। लोकाभिमुख सक्षम पंचायतराज उभारणे, पंचायतींचे आर्थिक सक्षमीकरण, मनरेगा व ग्रामविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवने हा या अभियानाचा उद्देश असून समृद्ध पंचायत राज अभियानातून ग्रामविकासाची गती वाढ
समृद्ध पंचायत राज अभियानातून ग्रामविकासाची गती वाढणार - पालकमंत्री गणेश नाईक


पालघर, 4 सप्टेंबर (हिं.स.)।

लोकाभिमुख सक्षम पंचायतराज उभारणे, पंचायतींचे आर्थिक सक्षमीकरण, मनरेगा व ग्रामविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवने हा या अभियानाचा उद्देश असून समृद्ध पंचायत राज अभियानातून ग्रामविकासाची गती वाढणार असल्याचा विश्वास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला

जिल्हा परिषद ,पालघर येथे ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली.

या कार्यशाळेस खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

जिल्हा परिषद ,मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, अपूर्वा बासुर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, प्रकल्प संचालक रूपाली सातपुते, सरपंच, उपसरपंच ,गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, उपस्थित होते.

लोकाभिमुख सक्षम पंचायतराज उभारणे, पंचायतींचे आर्थिक सक्षमीकरण, मनरेगा व ग्रामविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून ग्रामपंचायतींनी समृद्धीकडे वाटचाल करणे गरजेचे आहे. स्वच्छ गाव, सुंदर गाव आणि समृद्ध गाव या संकल्पनेतून विकसित व विकसनशील पंचायत निर्माण करण्यासाठी ठोस नियोजन करावे. असे आवाहन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. ढगफुटी, पावसाच्या बदलत्या पद्धती, निसर्गातील असमतोल यावर उपाय म्हणून झाडलावणीला प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात २५० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट राबविले जात असून टिश्यू कल्चरच्या माध्यमातून दर्जेदार रोपे निर्माण केली जातील, असे पालकमंत्री यांनी सांगितले.

तसेच ग्रामपंचायतींनी प्लास्टिक मुक्त गाव, स्वच्छता उपक्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सुविधा, शेतकरी व कामगार कल्याण, रोजगार निर्मिती या क्षेत्रात ठोस काम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “जात, धर्म, भाषा या भिंती पाडून माणुसकीला प्राधान्य दिले पाहिजे. ग्रामपातळीवर प्रत्येक नागरिकाच्या जीवनात समाधान निर्माण होणे हेच पंचायत राज व्यवस्थेचे खरे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande