केज शहरात दोघांना उडवल्यानंतर कार दुकानात घुसली, 3 जखमी
बीड, 10 जानेवारी (हिं.स.) केज शहराच्या मध्यवर्ती भागात एका कार चालकाने एका दुचाकीला धडक दिली आणि पळून जाण्याचा प्रयत्न करेल केला. परंतु पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना विद्यार्थ्यांला घडक देत एका दुकानासमोर उभ्या असलेल्या दुचाकी व स्कूटरला देख
केज शहरात दोघांना उडवल्यानंतर कार दुकानात घुसली, 3 जखमी


बीड, 10 जानेवारी (हिं.स.)

केज शहराच्या मध्यवर्ती भागात एका कार चालकाने एका दुचाकीला धडक दिली आणि पळून जाण्याचा प्रयत्न करेल केला. परंतु पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना विद्यार्थ्यांला घडक देत एका दुकानासमोर उभ्या असलेल्या दुचाकी व स्कूटरला देखील धडक दिली. त्यानंतर कार दुकानात घातली. त्यामुळे तिघे जखमी झाले.

हा अपघात केज शहरातील गजबजलेल्या कानडी रस्त्यावर घडला.

मेंढक तेलंगणा येथील कार चालक राम लक्ष्मण धर्मा (रा. मेंढक तेलंगणा) व त्याच्या शेजारी बसलेला नातेवाईक धनराज बन्सी चाळक (रा. लव्हुरी ता. केज) हे दोघे कार (एम एच १२ एचझेड २६६२) घेऊन केज शहरातील कानडी चौकात आले.त्यांनी चौकातून कानडी माळी

रस्त्याकडे वळत असताना एका दुचाकीला मागून धडक दिली. या दुचाकीवर मागे बसलेल्या आशाबाई धोंडीबा राऊत (रा. समर्थनगर केज) या जखमी झाल्या. त्यानंतर तो भरधाव वेगात पळून जात असताना त्याने उजव्या बाजूला असलेल्या नेहा ब्युटी शॉपी व साई मंगल सेवा केंद्र या दुकानाला धडक दिली. या अपघातात दुकानासमोर उभी असलेली एक स्कुटीला व दुचाकीला धडक देऊन रस्त्याने सायकलवरून शाळेला जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या सायकलला धडक दिल्याने या अपघात विद्यार्थ्यांसह काही नागरिक देखील किरकोळ जखमी झाले. तर कार चालक राम धर्मा व धनराज चाळक हे दोघे जखमी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande