
कोल्हापूर, 10 जानेवारी (हिं.स.)।
टोप ता. हातकणंगले येथे अवैध गौण खनिज वहातूक करणाऱ्या डंपर मालकाकडून हातकणंगले तहसीलदार आणि वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आली. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात डंपर मालक रमेश सर्जेराव शिंदे वय ४८ रा शिये ता. करवीर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की हातकणंगलेचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, क्लार्क गजानन मेघमाळे यांनी अवैध गौण खनिज वहातूकीबाबत टोप, परिसरात तपासणी करीत असताना शिये फाटा टोप येथे केएल 01-बीजे- 4077 क्रमांकाच्या डंपरला अडवले. या डंपरची तपासणी करीत असताना डंपर चालकाने डंपर मालक रमेश शिंदे याला बोलवून घेतले. रमेश शिंदे यांने डंपरची तपासणी करणारे तहसीलदार बेल्हेकर आणि मेघमाळे यानां तपासणी करण्यास मज्जाव करून अरेरावीचीआणि शिवराळ भाषा वापरून धमकी दिली. याबाबत टोपचे तलाठी अमर विमलकुमार कोटे यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार रमेश शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar