परभणीत कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू
परभणी, 10 जानेवारी (हिं.स.)। कारने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील तिघांचा मृत्यू झाला झरी जवळील दुर्देवी घटना घडली .वारकरी सांप्रदायातील किर्तनकारांच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे. जिंतूर ते परभणी या महामार्गावर झरीच्या अलिकडे शेख प
परभणीत कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू


परभणी, 10 जानेवारी (हिं.स.)।

कारने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील तिघांचा मृत्यू झाला झरी जवळील दुर्देवी घटना घडली .वारकरी सांप्रदायातील किर्तनकारांच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे.

जिंतूर ते परभणी या महामार्गावर झरीच्या अलिकडे शेख पाटी ते कालवा या दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री एका कारने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील तिघांचा मृत्यू झाला.

तालुक्यातील बोर्डी येथील वारकरी सांप्रदायातील प्रसिध्द मृदुंगाचार्य माऊली महाराज बोर्डीकर, प्रसाद महाराज बोर्डीकर व दत्ता महाराज मुडेकर हे तीघे किर्तनाचा एक कार्यक्रम आटोपून एका मोटारसायकलद्वारे बोर्डीकडे जात होते. शेख पाटी ते कालवा या दरम्यान एका कारने जोरदार धडक दिली. या धडकेने मोटारसायकलवरील हे तीघे मोटारसायकलसह व कार रस्ता सोडून 25 फुटापर्यंत एका शेतात जावून आदळली. त्यात मोटारसायकलवरील या तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, वारकरी सांप्रदायातील या तिघांच्या मृत्यूने जिंतूर तालुक्यात मोठी शोककळा पसरली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande