अवैध दारू विरुद्ध छापा कारवाई करून 1.92 लाखाचा मुद्देमाल जप्त आरोपीस अटक..!
अकोला, 10 जानेवारी (हिं.स.)। अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे स्थानिक गुन्हे शाखा अकोला च्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोली
Photo


अकोला, 10 जानेवारी (हिं.स.)।

अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे

स्थानिक गुन्हे शाखा अकोला च्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन चान्नीच्या हद्दीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी दारुबंदी कायद्यान्वये अवैध दारूविरुद्ध कारवाई करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आलेगाव येथे अवैध दारूवर छापाग्राम आलेगाव येथे पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला असता आरोपी नामे देवदत्त सुखदेव तेलगोटे, वय 50 वर्षे, रा. आलेगाव, ता. पातूर, जि. अकोला यांच्या ताब्यातून अवैधरित्या बाळगलेला 450 लिटर मोहमाचा सडवा किंमत रुपये 67,500/- व 30 लिटर हातभट्टी दारू किंमत रुपये 6,000/- असा एकूण रुपये 73,500/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अंधार सांगवी येथे प्रोव्हिजन रेडतत्सम कारवाई ग्राम अंधार सांगवी येथे करण्यात आली. येथे आरोपी नामे प्रकाश यादव झटाले, वय 45 वर्षे, रा. अंधार सांगवी, ता. पातूर, जि. अकोला यांच्या ताब्यातून 750 लिटर मोहमाचा सडवा किंमत रुपये 1,12,500/- तसेच हातभट्टी दारू किंमत रुपये 6,000/- असा एकूण रुपये 1,18,500/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही नमूद आरोपींविरुद्ध दारुबंदी कायद्यान्वये कलम 65 (ई) अंतर्गत गुन्हा पोलीस स्टेशन चान्नी येथे दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. कारवाई करणारे

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, अर्चित चांडक तसेच अपर पोलीस अधीक्षक, रेड्डी, शंकर शेळके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे मार्गदर्शनाखी API श्री. विजय चव्हाणHC महेंद्र मलिये, HC माजीद, Hc रवी खंडारे, HC वसीमोद्दीन, HC खुशाल नेमाडे, PC धिरज वानखेडे, चालक HC कमलाकर सर्व स्था. गु. शा., अकोला यांनी केली

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande