छ. संभाजीनगरमध्ये 'एमआयएम'च्या उमेदवारासह अकरा जणांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील शहागंज परिसरात प्रचार करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना ''एमआयएम''च्या एका उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचारासाठी पुढे जाण्यास अटकाव केला. तसेच मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार
छ. संभाजीनगरमध्ये 'एमआयएम'च्या उमेदवारासह अकरा जणांवर गुन्हा दाखल


छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील शहागंज परिसरात प्रचार करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना 'एमआयएम'च्या एका उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचारासाठी पुढे जाण्यास अटकाव केला. तसेच मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला‌ होता. या प्रकरणी सिटीचौक पोलिस 'एमआयएम'च्या ११ जणांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मलेका कुरेशी हबीब कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महापालिका निवडणूक प्रचारासाठी फिर्यादी ह्या समर्थकांसह बनेमियां दर्जा रोड, शहागंज परिसरात जात होत्या. त्याच दरम्यान, एमआयएमचे उमेदवार फेरोज खान मोईनोद्दीन खान ( रा. शहागंज) यांनी बेकायदेशीर दमाव जमवून फिर्यादीसमोर आला व निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव टाकण्यासाठी, तुम्ही प्रभागामध्ये येवून प्रचार का करतात, असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ केली.

तसेच यांना मारा, येथून काढून घ्या, अशी चिथावणी साथीदारांना दिली. त्यानंतर आरोपीतांनी फिर्यादी व फिर्यादीच्या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी पुढे जाण्यासाठी अटकाव केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी फेरोज खान मोईनोद्दीन खान यासह अफरोज खान मोईनोद्दीन खान, अकबर खान मोईनोद्दीन खान, माजेद खान, असरार खान, रहीम खान, रफीना बेगम, मुजाहेद खान शकील खान, अदनान अश्रफ हुसैनी, मास खान व आमेर यांच्याविरोधात दुन्हा दाखल करण्यात आल्याचे सिटीचौक पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अजीत दगडखैर करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande