१५ जानेवारीला शेअर बाजार सुरु; मात्र सेटलमेंटवर परिणाम
मुंबई, 10 जानेवारी (हिं.स.)। बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील इतर २८ महानगरपालिकांच्या निवडणुका गुरुवार, १५ जानेवारी रोजी होणार असल्याने राज्य सरकारने त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालये बंद राहणार अस
NSE BSE


मुंबई, 10 जानेवारी (हिं.स.)। बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील इतर २८ महानगरपालिकांच्या निवडणुका गुरुवार, १५ जानेवारी रोजी होणार असल्याने राज्य सरकारने त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालये बंद राहणार असली तरी, शेअर बाजाराबाबत संभ्रम निर्माण झाला होता. एनएसई आणि बीएसईच्या सुट्टी यादीनुसार १५ जानेवारी रोजी बाजार बंद नसून नियमित व्यवहार सुरू राहणार आहेत.

एनएसईने जारी केलेल्या ताज्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की त्या दिवशी ट्रेडिंग नेहमीप्रमाणे होईल, मात्र महानगरपालिका निवडणुकांमुळे निधी आणि शेअर्सचे सेटलमेंट होणार नाही. म्हणजेच व्यवहार होतील, पण त्यांचे अधिकृत सेटलमेंट पुढील कामकाजाच्या दिवशी प्रक्रिया केली जाईल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरण्याची गरज नाही, कारण ट्रेडिंगवर थेट परिणाम होणार नाही, फक्त सेटलमेंटमध्ये एका दिवसाचा विलंब होईल.

दरम्यान, बीएमसी या देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईचे प्रशासन करणारी आणि ७४,००० कोटी रुपयांहून अधिक बजेट असलेली सर्वात प्रभावी महानगरपालिका असल्याने या निवडणुकांना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील सर्व २९ शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १५ जानेवारी २०२६ रोजी होत असून निकाल १६ जानेवारीला जाहीर होणार आहेत. वर्ष २०२६ मध्ये शेअर बाजाराला एकूण १५ दिवस सुट्टी असणार असून त्याची सुरुवात २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनापासून होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande