
मुंबई, 12 मार्च (हिं.स.) : मोतीलाल ओसवाल वेल्थ मॅनेजमेंट या रिटेल ब्रोकिंग आणि वितरण विभागाने, गुंतवणूकदारांना एका समर्पित डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे— https://bonds.motilaloswal.com — फिक्स्ड इन्कमच्या संधी उपलब्ध करून देऊन आपल्या वेल्थ मॅनेजमेंट सेवांचा विस्तार करण्यासाठी बॉन्ड प्रोव्हायडर प्लॅटफॉर्म सादर केला आहे.
जे गुंतवणूकदार स्थिरता, सातत्यपूर्ण वाढ आणि भांडवल संरक्षणास प्राधान्य देतात, अशा गुंतवणूकदारांसाठी बॉन्ड्स नियमित आणि निष्क्रीय परतावा (Passive returns) देतात, ज्यामुळे ते वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओचा एक अविभाज्य भाग बनतात. बॉन्ड्सच्या सामर्थ्याने गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून, मोतीलाल ओसवाल वेल्थ मॅनेजमेंट आता सरकारी सिक्युरिटीज (G-Secs), सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे बॉन्ड्स (PSU Bonds) आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स अशा विविध फिक्स्ड इन्कम साधनांमध्ये प्रवेश प्रदान करेल. हे इक्विटी-आधारित संपत्ती निर्मितीला पूरक ठरेल आणि भारताच्या बाजारपेठेतील वाढीमुळे निर्माण झालेल्या संपत्तीचे रक्षण आणि स्थिरीकरण करण्यास गुंतवणूकदारांना मदत करेल.
भारतीय बॉन्ड मार्केट हे जपान आणि चीननंतर आशियातील तिसरे सर्वात मोठे मार्केट म्हणून उदयास आले आहे, ज्याचा आकार सुमारे $3 ट्रिलियन (3 लाख कोटी डॉलर्स) इतका आहे, जो भारताच्या जीडीपीच्या अंदाजे 100-110% इतका आहे. हे प्रमाण गुंतवणूकदार आणि वेल्थ मॅनेजर्ससाठी एक मोठी संधी प्रस्तुत करते. सध्याचे जागतिक वातावरण देखील पोर्टफोलिओमध्ये फिक्स्ड इन्कम वाटपाचे महत्त्व अधोरेखित करत आहे. वाढता भू-राजकीय तणाव आणि सुरू असलेल्या जागतिक अनिश्चिततेमुळे इक्विटी मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा काळात, बॉन्ड्स अंदाज लावता येण्यासारखे उत्पन्न स्रोत आणि तुलनेने कमी अस्थिरता प्रदान करून पोर्टफोलिओ वैविध्यीकरणात महत्त्वाची भूमिका बजावता.
अजय मेनन, एमडी आणि सीईओ, वेल्थ मॅनेजमेंट, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. म्हणाले, धोरणात्मक अनुकूलता, गुंतवणूकदारांमधील वाढती जागरूकता आणि अधिक संतुलित पोर्टफोलिओकडे वळलेला कल यामुळे गेल्या दशकात भारताच्या कॉर्पोरेट बॉन्ड मार्केटचा लक्षणीय विस्तार झाला आहे. भारतीय कुटुंबे वाढत्या प्रमाणात आपली बचत आर्थिक मालमत्तेत गुंतवत आहेत आणि जागतिक निर्देशांकात भारतीय सरकारी बॉन्ड्सचा समावेश झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय ओघ येण्याची अपेक्षा आहे, यामुळे फिक्स्ड इन्कममधील संधी अधिक आकर्षक होत आहेत. भारताच्या बॉन्ड मार्केटच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर, बॉन्ड्सचे प्रवेश सुलभ करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना त्यांची संपत्ती सुरक्षित ठेवत अंदाज लावता येण्यासारखे उत्पन्न मिळवून देण्यासाठी आमचे बॉन्ड प्रोव्हायडर प्लॅटफॉर्म लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे.
आशिष मालवीय, हेड डिस्ट्रिब्युशन, वेल्थ मॅनेजमेंट, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. म्हणाले, जागतिक घडामोडींमुळे वाढलेल्या इक्विटी मार्केटमधील अस्थिरतेच्या दरम्यान, गुंतवणूकदार, विशेषतः श्रीमंत गुंतवणूकदार (HNIs), वाढत्या प्रमाणात भांडवल संरक्षण, अंदाजित उत्पन्न आणि पोर्टफोलिओ स्थिरतेचा शोध घेत आहेत. त्याच वेळी, भारताच्या मोठ्या पायाभूत सुविधांच्या वित्ताच्या गरजांमुळे बॉन्ड मार्केट हे निधी उभारणीचे प्रमुख माध्यम राहील अशी अपेक्षा आहे. स्थिर उत्पन्न देणाऱ्या मालमत्तेची वाढती मागणी पाहता, पोर्टफोलिओ वाटपात फिक्स्ड इन्कमची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
हारित ओबेरॉय, हेड - फिक्स्ड इन्कम, वेल्थ मॅनेजमेंट, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. म्हणाले, भारताच्या डेट मार्केटवर पारंपारिकपणे संस्थात्मक गुंतवणूकदारांचे वर्चस्व राहिले असले तरी, नियामक सुधारणा आणि बॉन्डमधील गुंतवणुकीची सुलभता यामुळे किरकोळ सहभाग हळूहळू वाढत आहे. पोर्टफोलिओ वैविध्यीकरणात कॉर्पोरेट बॉन्ड्सची भूमिका गुंतवणूकदार ओळखत असताना, आमच्या प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट आकर्षक परतावा आणि अंदाजित रोख प्रवाह असलेल्या संधी उपलब्ध करून देणे आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांशी सुसंगत असा संतुलित पोर्टफोलिओ तयार करण्यास सक्षम करता येईल.”
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी