
नवी दिल्ली , 12 जानेवारी (हिं.स.)।सोमवारी सकाळी दिल्लीहून विजयवाडाकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI2517 फ्लाइटमध्ये एका वृद्ध प्रवाश्याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे फ्लाइटचे जयपूर एअरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
AI2517 या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाची अचानक तब्येत बिघडली. यानंतर एअरलाइनने फ्लाइटला आपत्कालीन लँडिंग करणे गरजेचे ठरवले. जयपूर एअरपोर्टवर सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांनी सुरक्षित लँडिंग केल्यानंतर वृद्ध प्रवाश्याला विमानातून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये हलवले गेले. सध्या फ्लाइटमधील प्रवाश्यांची संख्या किती होती याची माहिती मिळालेली नाही. याबाबत एअर इंडियाकडून कोणताही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाईटनुसार, ही फ्लाइट A320 विमानवर ऑपरेट केली जात होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode