चंद्रपूर: प्रचाराचा शेवटचा रविवार ठरला महत्वाचा
चंद्रपूर, 12 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा रविवार असल्याने चंद्रपूर शहरात राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. शहरातील जवळपास सर्वच प्रभागांमध्ये रविवारी सभा, पदयात्रा, कोपरा बैठक, घरभेटी, वाहन रॅली आणि रोड शो यांच
चंद्रपूर: प्रचाराचा शेवटचा रविवार ठरला महत्वाचा


चंद्रपूर, 12 जानेवारी (हिं.स.)।

महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा रविवार असल्याने चंद्रपूर शहरात राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. शहरातील जवळपास सर्वच प्रभागांमध्ये रविवारी सभा, पदयात्रा, कोपरा बैठक, घरभेटी, वाहन रॅली आणि रोड शो यांचा धुरळा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

प्रचाराचा रविवार राजकीय पक्ष व पक्षासाठी निर्णायक ठरला. सुरुवातीच्या टप्प्यात काहीसा थंडावलेला प्रचार आता गाजू लागला आहे. सर्व पक्षांनी रणनीती आखली आहे. मंगळवारी प्रचाराची अधिकृत सांगता होणार असल्याने सर्वच पक्षांचे उमेदवार अखेरचा जोर लावत मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. आजचा दिवस महत्त्वाचा असल्याने उमेदवारांनी वेळेचे काटेकोर नियोजन केले होते. सकाळी लवकर पदयात्रा काढून मतदारांशी थेट संवाद साधला गेला. दुपारी घरभेटी आणि कोपरा बैठकींतून स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली गेली, तर सायंकाळी जाहीर सभा आणि वाहन रॅलींच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले गेले. प्रचार संपल्यानंतर लगेचच आचारसंहिता अधिक कडक होणार असल्याने उमेदवारांमध्ये तणाव वाढला आहे. अखेरचा रविवार मतदारांच्या मनावर किती प्रभाव टाकण्यात किती यशस्वी झाला, हे निवडणुकीचा निकालावरून ठरणार आहे.

पदयात्रा, रॅली, महिला वा तरुणांसाठी विशेष मोहिमा, तसेच ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला जात आहे. अनेक उपक्रमांत बुधनिहाय यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही शेवटच्या टप्याची प्रचाराची तीव्रता वाढली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande