
अमरावती, 12 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित करण्यासाठी माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी संपूर्ण ताकदीनिशी प्रचाराला सुरुवात केली आहे. शहरातील सर्व प्रभागांमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सक्रिय असून, त्यांचा प्रचार दौरा अक्षरशः झंझावाती ठरत आहे.
दररोज पहाटे पूजा-पाठाचा नित्यक्रम आटोपून प्रवीण पोटे पाटील प्रचारासाठी घराबाहेर पडतात. त्यानंतर दिवसभर विविध प्रभागांमध्ये महत्त्वाच्या नागरिकांशी बैठका, कॉर्नर मीटिंग्स तसेच मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. रात्री उशिरापर्यंत बैठका, प्रचार फेऱ्या आणि कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असते. प्रत्येक प्रभागात भाजपचा संदेश पोहोचवण्यासाठी ते स्वतः पुढाकार घेत आहेत.प्रचारादरम्यान प्रवीण पोटे पाटील अमरावती शहराच्या विकासासाठी भाजपचा स्पष्ट आणि दूरदृष्टीपूर्ण व्हिजन नागरिकांसमोर मांडत आहेत. शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण यासोबतच औद्योगिक विकासावर भाजपचा विशेष भर असल्याचे ते अधोरेखित करत आहेत. अमरावतीत रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी आयटी पार्कसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांचीही माहिती ते देत आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.“प्रत्येक प्रभागातून भाजपचे उमेदवार निवडून द्या, शहराच्या विकासाला गती द्या,” असे आवाहन ते सातत्याने मतदारांना करत आहेत. त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत होत आहे. लोकांमध्ये प्रवीण पोटे पाटील यांच्याबद्दल विश्वास आणि आपुलकी दिसून येत आहे.या प्रचार मोहिमेदरम्यान खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार राजेश बकाने, आमदार प्रवीण तायडे, जयंत डेहनकर, शिवराय कुलकर्णी, नितीन गुडधे आदी नेते व पदाधिकारी उपस्थित राहून प्रचाराला बळ देत आहेत. सर्व नेते, कार्यकर्ते आणि उमेदवार एकत्र येऊन “भाजप – विकासाचा विश्वास” हा संदेश घराघरात पोहोचवत आहेत.एकूणच, अमरावती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचा हा जोरदार प्रचार भाजपसाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत असून, शहरात निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी