सोशल मीडियावरील भारतीय नागरिकांना अटक केल्याच्या बातम्या खोट्या - इराण
नवी दिल्ली , 12 जानेवारी (हिं.स.)।इराणमध्ये खामेनेई सरकारच्या विरोधात लोक हिंसक निदर्शने करत आहेत. या सत्ताविरोधी आंदोलनात आतापर्यंत ५०० हून अधिक लोक ठार झाले आहेत, तर हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे. याच दरम्यान, सोशल मीडियावर एक बातमी जोरदारपणे
सोशल मीडियावरील भारतीय नागरिकांना अटक केल्याच्या बातम्यांना इराणने सांगितले खोटे


नवी दिल्ली , 12 जानेवारी (हिं.स.)।इराणमध्ये खामेनेई सरकारच्या विरोधात लोक हिंसक निदर्शने करत आहेत. या सत्ताविरोधी आंदोलनात आतापर्यंत ५०० हून अधिक लोक ठार झाले आहेत, तर हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे. याच दरम्यान, सोशल मीडियावर एक बातमी जोरदारपणे व्हायरल होत आहे. या बातमीत असा दावा करण्यात आला की इराण पोलिसांनी अनेक भारतीय नागरिकांना अटक केली आहे. तथापि, इराणने या बातम्यांना पूर्णपणे खोटे असल्याचे सांगितले आहे.

तेहरानसह संपूर्ण देशभर पसरलेल्या आंदोलनाच्या दरम्यान असा दावा केला जात होता की इराणी पोलिसांनी सहा भारतीय नागरिकांना अटक केली आहे. पोस्टमध्ये असेही म्हटले होते की इराणी पोलिसांनी १० अफगाण आणि ६ भारतीय नागरिकांसह काही इराणी सहकार्यांना अटक केली आहे.यावर भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहअली यांनी भारतीयांची अटक झाल्याच्या रिपोर्टला पूर्णपणे खोटे असल्याचे सांगितले आहे. भारतीय नागरिकांविषयी केलेल्या दाव्यांचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर (एक्सवर) शेअर करताना इराणी राजदूत म्हणाले, “इराणमध्ये चाललेल्या घटनांबाबत काही विदेशी एक्स अकाउंट्सवर जे बातम्या पसरवल्या जात आहेत, त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. मी सर्वांना विनंती करतो की बातम्या फक्त विश्वासार्ह स्रोतांकडूनच मिळवाव्यात.”

दरम्यान, इराणमध्ये राष्ट्रव्यापी निदर्शने आणि त्यावर झालेल्या कारवाईत किमान ५४४ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत असलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अहवालानुसार, दोन आठवड्यांहून अधिक काळ चाललेल्या निदर्शनेदरम्यान १०,६०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले गेले आहे. एजन्सीने म्हटले की, मृतांमध्ये ४९६ प्रदर्शनकारी आणि ४८ सुरक्षा दलाचे जवान आहेत. तरीही इराण सरकारने एकूण मृतांची संख्या अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.देशभरातील इंटरनेट आणि टेलिफोन सेवा बंद असल्यामुळे परिस्थितीची स्वतंत्र पुष्टी करणे अत्यंत कठीण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande