स्वामी विवेकानंद यांच्या १६३व्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
नवी दिल्ली , 12 जानेवारी (हिं.स.)।सोमवारी संपूर्ण देश स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करत आहे. त्यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेका
स्वामी विवेकानंद यांच्या १६३व्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली


नवी दिल्ली , 12 जानेवारी (हिं.स.)।सोमवारी संपूर्ण देश स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करत आहे. त्यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांना श्रद्धांजली अर्पण केली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सांगितले की, त्यांनी भारतीयांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत केली आणि युवकांना राष्ट्रनिर्माणात योगदान देण्यासाठी प्रेरित केले. ‘एक्स’वरील आपल्या पोस्टमध्ये राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले, “ते एक कालजयी दूरदर्शी आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते. अंतर्गत शक्ती आणि मानवतेची सेवा हीच अर्थपूर्ण जीवनाची पायाभरणी आहे, असा त्यांनी उपदेश केला. भारताचे शाश्वत ज्ञान त्यांनी जगापर्यंत पोहोचवले.”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले,“भारतीय युवा शक्तीसाठी प्रेरणास्रोत असलेल्या स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त माझी आदरपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य विकसित भारताच्या संकल्पाला सातत्याने नवी ऊर्जा देणारे आहे. राष्ट्रीय युवा दिनाचा हा पवित्र प्रसंग सर्व देशवासीयांसाठी, विशेषतः आपल्या तरुण मित्रांसाठी, नवी ताकद आणि नवा आत्मविश्वास घेऊन येवो, हीच माझी शुभेच्छा आहे.”

यासोबतच त्यांनी पुढे लिहिले, “स्वामी विवेकानंद यांचा ठाम विश्वास होता की युवकशक्ती ही राष्ट्रनिर्माणाची सर्वात मजबूत पायाभरणी आहे. भारतीय युवक आपल्या जोश आणि जुनूनच्या बळावर कोणताही संकल्प साकार करू शकतात.”

स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी तत्कालीन कलकत्त्यात नरेंद्रनाथ दत्त या नावाने झाला होता. त्यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठ आणि मिशनच्या मुख्यालय असलेल्या बेलूर मठात आज, सकाळी लवकर मंगल आरती आणि विशेष प्रार्थनांनी उत्सवाची सुरुवात झाली. दरम्यान, रामकृष्ण मठ आणि मिशनच्या विविध शाखांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून शोभायात्रा काढल्या असून, त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande