राजापूर उपनगराध्यक्षपदी उबाठाचे विनय गुरव बिनविरोध
रत्नागिरी, 13 जानेवारी, (हिं. स.) : राजापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक विनय गुरव यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत विरोधी महायुतीच्या वतीने अर्ज न सादर करण्यात आल्याने उप
राजापूर उपनगराध्यक्षपदी उबाठाचे विनय गुरव बिनविरोध


रत्नागिरी, 13 जानेवारी, (हिं. स.) : राजापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक विनय गुरव यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत विरोधी महायुतीच्या वतीने अर्ज न सादर करण्यात आल्याने उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली.

स्वीकृत सदस्य म्हणून महाविकास आघाडीतर्फे पत्रकार महेश शिवलकर यांची तर महायुतीतर्फे माजी नगरसेवक सुभाष शाम बाकाळकर यांची नियुक्ती करण्यात आली.

राजापूर नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना झाला होता. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांनी प्रत्येकी दहा जागा जिंकल्या . मात्र अटीतटीच्या झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आणि लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवार माजी नगराध्यक्षा आणि माजी विधानपरिषद सदस्या अॅड. हुस्नबानू खलिफे विजयी झाल्या.

पालिकेतील सत्ताबळ लक्षात घेता महाविकास आघाडीसह महायुतीला प्रत्येकी एकेक स्वीकृत सदस्य मिळणार हे निश्चित होते. शिवाय पालिकेतील संख्यबळ पाहता महाविकास आघाडीचाच उपगराध्यक्ष होणार हेदेखील नक्की होते. महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपद काँग्रेसकडे असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उपनगराध्यक्षपद मिळाले आहे. आज पालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात निवडणूक घेण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा अॅड. हुस्नबानू खलिफे म्हणून काम पाहिले. प्रभारी मुख्याधिकारी अभिजित कुंभार, पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांच्यासह सर्व नवनियुक्त नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande