
अकोला, 13 जानेवारी (हिं.स.)।
अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमधील प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख बच्चू कडू अकोल्यातील डाबकी रोड येथे दाखल झाले होते. यावेळी बोलताना महानगरपालिका निवडणुकीत युतीच्या भानगडीत मी पडत नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. मात्र प्रभाग क्रमांक आठमधील एका जागेसाठी जुन्या मित्रांसोबत शिवसेना ठाकरे गट आणि प्रहार एकत्र आल्याचेही त्यांनी सांगितले. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना “बटेंगे तो कटेंगे म्हणतात, पण नवरा वेगळा, बायको वेगळी आणि पोरगा आता प्रहारमध्ये द्यावा,” असा टोला त्यांनी लगावला. भाजप प्रभू रामचंद्रांच्या नावाने मते मागत असून जाती-धर्माच्या नावाने किंवा पैशांच्या जोरावर मते विकत घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. लाडकी बहीण योजना ही सरकारवर आलेल्या आपत्तीमुळेच आणली असल्याचेही बच्चू कडू म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे