सर्व वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे - सोलापूर जिल्हाधिकारी
सोलापूर, 13 जानेवारी (हिं.स.)। संपूर्ण देशभरात तामिळनाडू व महाराष्ट्र राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण खूप अधिक आहे. रस्ते अपघातामध्ये मानवी चुका तसेच तांत्रिक चुकांचाही समावेश आहे. तरी सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी परिवहन विभागामार्फत करण्यात आलेल्य
सर्व वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे - सोलापूर जिल्हाधिकारी


सोलापूर, 13 जानेवारी (हिं.स.)। संपूर्ण देशभरात तामिळनाडू व महाराष्ट्र राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण खूप अधिक आहे. रस्ते अपघातामध्ये मानवी चुका तसेच तांत्रिक चुकांचाही समावेश आहे. तरी सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी परिवहन विभागामार्फत करण्यात आलेल्या वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

नियोजन भवन येथे37वे जिल्हा रस्ता सुरक्षा अभियान या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दीप प्रज्वलनानेकेले. यावेळी महापालिका आयुक्त सचिन ओंबसे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,पोलीस आयुक्त एम राजकुमार,पोलीस अधीक्षक ग्रामीण अतुल कुलकर्णी,अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम शामराव कुंभार, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, पोलीस उपायुक्त शहर गौहर हसन,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अकलूज अमरसिंह गवारे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मुलाणी तसेच अधिकारी कर्मचारी मोटरड्रायव्हिंगस्कूल संघटनेचे पदाधिकारी, रिक्षा चालक-मालक संघटना पदाधिकारी व इंजीनियरिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की,सोलापूर शहरामध्ये कोणीही दुचाकी चालवत असताना हेल्मेट वापरत नसल्याचे दिसते. वाहन चालवताना अतिवेग व चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणे,सिग्नलचे पालन न करणे यामुळे अपघात होत असतात,सर्व वाहनचालकांनी विशेषता तरुण वर्गाने वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे तसेच आपल्या संपर्कातील घरातील इतर व्यक्तींना वाहतुकीचे नियम पाळण्यास जागृत केले पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande