
सोलापूर, 13 जानेवारी (हिं.स.)शिवयोगी श्री सिध्दरामेश्वराच्या आशीवार्दाने पुण्य पावन झालेल्या सोलापूर शहर श्री सिध्देश्वर मंदीर येथील संमती कट्टा येथे अक्षता सोहळा उत्साहात पार पडला. संमती कट्टा येथे प्रत्येकवर्षी राजदंड व कुंभार कन्या यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो. प्रथम संमतीकट्टा येथे पालखी व योगदंडाचे आगमन झाले व त्यानंतर नंदीध्वजाचे आगमन झाले. गंगापूजा व सुगडीपजनानंतर अक्षता सोहळ्यास सुरुवात झाली.
या सोहळ्यास महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राजकुमार, सोलापूर ग्रामीण पोलिस आयुक्त अतुल कुलकर्णी, श्री गौहर हसन, श्रीमती आश्विनी पाटील, श्री विजय कबाडे, मनपा आयुक्त आकुलवार, जगदगुरु डॉ. मल्लीकार्जुन महाचार्य स्वामी, माजी खासदार जयसिध्देश्वर महास्वामी, धर्मराज काडादी, मानकरी राजशेखर हिरेहब्बू व समस्त हिरेहब्बू परिवार, पंचकमिटीचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवरहा अक्षता सोहळा पाहण्यासाठी आलेले भाविक व बाराबंदी वेश परिधान केलेले भक्तगण यांच्या उपस्थितीत हा अक्षता सोह
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड