
परभणी, 13 जानेवारी (हिं.स.)। ज्ञानसाधना प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी व ज्ञानसाधना प्रतिष्ठान एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन(एमबीए )यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. ज्यांच्या प्रेरणेने या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले ते ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे संस्थाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के व संस्था सचिव शितल सोनटक्के, मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हचे मॅनेजिंग डायरेक्टर सिद्धांत राजूरकर, मिलिंद आठवले व विनय कच्छवे यांची उपस्थिती होती. या कॅम्पस मुलाखतीमध्ये फार्मसी महाविद्यालय व ज्ञानसाधना प्रतिष्ठान एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन( एमबीए )महाविद्यालयाच्या 107 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते. ज्यात मुलाखतीची तयारी, रिझुम लेखन आणि ग्रुप डिस्कशनवर भर देण्यात आला होता. फार्मसी महाविद्यालयाचे समन्वयक डी.व्ही. सूर्यवंशी व प्राचार्य एम.डी.सलाउद्दीन यांनी विद्यार्थ्यांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल व त्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आणि कंपनीचे आभार मानले. कॉलेजने दिलेल्या मार्गदर्शनामुळे आणि प्रशिक्षणाने आमचा आत्मविश्वास वाढला आज आम्हाला आमच्या स्वप्नातील नोकरी मिळण्याची संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिल्याची प्रतिक्रिया सहभागी विद्यार्थ्यांनी दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis