दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण : पाच आरोपींच्या एनआयए कोठडीत 16 जानेवारीपर्यंत वाढ
नवी दिल्ली , 14 जानेवारी (हिं.स.)।लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात पटियाला हाऊस सत्र न्यायालयाने तीन डॉक्टर आणि एका मौलवीसह पाच आरोपींची राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) यांची कोठडी 16 जानेवारीपर्यंत वाढवली आहे.प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू बजाज
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण: पाच आरोपींच्या एनआयए कोठडीत 16 जानेवारीपर्यंत वाढ


नवी दिल्ली , 14 जानेवारी (हिं.स.)।लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात पटियाला हाऊस सत्र न्यायालयाने तीन डॉक्टर आणि एका मौलवीसह पाच आरोपींची राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) यांची कोठडी 16 जानेवारीपर्यंत वाढवली आहे.प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू बजाज चंदना यांनी तपास यंत्रणेचा अर्ज मंजूर केला असून, त्यामध्ये डॉ. आदिल राठर, डॉ. शाहीन सईद, डॉ. मुजम्मिल गनई, मौलवी इरफान अहमद वागे आणि जसीर बिलाल वानी यांच्या कोठडीत चौकशी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती.

न्यायालयासमोर सादर केलेल्या रिमांड कागदपत्रांमध्ये तपास यंत्रणेने सांगितले की, काही परस्परविरोधी विधानांच्या संदर्भात आरोपींचा इतर सहआरोपी, संशयित आणि साक्षीदारांशी समोरासमोर तपास (कॉन्फ्रन्टेशन) करणे आवश्यक आहे. तपास यंत्रणेने यावर भर दिला की, आरोपींना जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि एनसीआरसह अनेक ठिकाणांशी संबंधित महत्त्वाची माहिती आणि परिस्थितीची जाण होती.

तसेच, काही साक्षीदारांकडून मिळालेल्या डेटामधून आणि जप्त केलेल्या डिजिटल उपकरणांच्या तांत्रिक विश्लेषणातून हे महत्त्वाचे तथ्य समोर आल्याचे एजन्सीने सांगितले. मागील कोठडीनंतर काही कोड वर्ड्स आणि अन्य आक्षेपार्ह साहित्य हाती लागल्याचेही तपास यंत्रणेने नमूद केले.

मोठ्या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी आरोपींची कोठडी वाढवणे आवश्यक असल्याचे एनआयएने स्पष्ट केले. या प्रकरणातील आत्मघाती हल्लेखोर उमर-उन-नबी हा लाल किल्ल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली कार चालवत होता. 10 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या या बॉम्बस्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला होता.या प्रकरणात आतापर्यंत तपास यंत्रणेने एकूण नऊ आरोपींना अटक केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande