भारतीय पासपोर्ट 80 व्या स्थानावर; 55 देशांमध्ये व्हिसा-मुक्त किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल प्रवेश
नवी दिल्ली, 14 जानेवारी (हिं.स.)। हेनली अँड पार्टनर्सने जाहीर केलेल्या 2026 च्या पासपोर्ट रँकिंगमध्ये भारतीय पासपोर्टने पाच स्थानांची उन्नती करून 80 वा क्रमांक मिळवला आहे. मागील वर्षी 2025 मध्ये भारताची रँक 85 होती, तर 2024 मध्येही तो 80 व्या स्थान
Indian Passport


नवी दिल्ली, 14 जानेवारी (हिं.स.)। हेनली अँड पार्टनर्सने जाहीर केलेल्या 2026 च्या पासपोर्ट रँकिंगमध्ये भारतीय पासपोर्टने पाच स्थानांची उन्नती करून 80 वा क्रमांक मिळवला आहे. मागील वर्षी 2025 मध्ये भारताची रँक 85 होती, तर 2024 मध्येही तो 80 व्या स्थानावर होता. नवीन रँकिंगनुसार, भारतीय नागरिक आता 55 देशांमध्ये व्हिसा-मुक्त किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल प्रवासाचा लाभ घेऊ शकतात. यामुळे गेल्या वर्षी झालेल्या क्रमवारीतील घसरणी नंतर पुनरुज्जीवन दिसून येते, जरी व्हिसा-मुक्त प्रवेशासाठी उपलब्ध देशांची संख्या दोन ने कमी झाली आहे.

पासपोर्टची ताकद हे त्याच्या धारकाला किती देशांमध्ये पूर्व व्हिसा न घेता प्रवेश करता येतो यावर आधारित ठरवले जाते. वर्षातून दोनदा, जानेवारी आणि जुलैमध्ये हेनली पासपोर्ट व्हिसा इंडेक्सचा डेटा अपडेट केला जातो आणि व्हिसा पॉलिसीमधील बदलही यात प्रतिवर्तनात घेतले जातात.

जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट हा सलग दुसऱ्या वर्षी सिंगापूरचा आहे. सिंगापूर नागरिकांना 192 पैकी 227 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश मिळतो. जपान आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांनी संयुक्तपणे दुसरे स्थान मिळवले असून त्यांच्या नागरिकांना 188 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवासाचा लाभ मिळतो. डेनमार्क, लक्झेंबर्ग, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड अशा देशांनी 186 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश मिळवल्यामुळे तिसऱ्या स्थानावर ठिकाण मिळवले आहे.

या यादीत अफगाणी पासपोर्ट सर्वात कमकुवत आहे आणि 101 व्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा पासपोर्टही यादीत पाचवा सर्वात कमकुवत मानला जातो आणि त्याची नवीन रँक 98वी आहे. पाकिस्तानचे नागरिक 31 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करू शकतात, जे मागील वर्षी 33 होते.

पासपोर्ट हा कोणत्याही देशाच्या सरकारने जारी केलेला एक अधिकृत दस्तऐवज आहे, जो आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी व्यक्तीची ओळख व राष्ट्रीयत्व सिद्ध करतो. त्यामुळे पासपोर्टमुळे व्यक्ती एका देशातून दुसऱ्या देशात जाईपर्यंत अधिकृत ओळख व परवानगी मिळते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास सोपा आणि सुरक्षित होतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande