काश्मीर प्रश्नावर लष्कर-ए-तोयबाची भारताला धमकी; व्हिडिओ व्हायरल
नवी दिल्ली , 14 जानेवारी (हिं.स.)।पाकिस्तान पुन्हा एकदा दहशतवादाला उघड पाठिंबा देत असल्याचे चित्र समोर आले आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा (LeT) एका वरिष्ठ दहशतवादी अबू मूसा कश्मीरी याने सार्वजनिक मंचावरून हिंदूंविरुद्ध उघडपणे ह
काश्मीर प्रश्नावर लष्कर-ए-तोयबाची भारताला धमकी; व्हिडिओ व्हायरल


नवी दिल्ली , 14 जानेवारी (हिं.स.)।पाकिस्तान पुन्हा एकदा दहशतवादाला उघड पाठिंबा देत असल्याचे चित्र समोर आले आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा (LeT) एका वरिष्ठ दहशतवादी अबू मूसा कश्मीरी याने सार्वजनिक मंचावरून हिंदूंविरुद्ध उघडपणे हिंसेचे आवाहन केले आहे. काश्मीर प्रश्नाचा तोडगा केवळ दहशतवाद आणि तथाकथित जिहादातूनच शक्य असल्याचा त्याने दावा केला आहे. या धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर भारताच्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

दहशतवादी अबू मूसा कश्मीरी याने एक सार्वजनिक कार्यक्रमातील भाषणात बोलताना काश्मीर प्रश्नाचा तोडगा केवळ दहशतवाद आणि तथाकथित जिहादातूनच शक्य असल्याचा दावा केला आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये जमावाला असे म्हणताना ऐकू येते की, “स्वातंत्र्य भीक मागून नाही, तर हिंदूंचे गळे कापून मिळेल.” अबू मूसा कश्मीरीने दावा केला आहे की, त्याने आपले हे विचार पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि इतर वरिष्ठ मंत्र्यांपर्यंत थेट पोहोचवले आहेत. काश्मीर प्रश्नावर दहशतवाद हाच एकमेव मार्ग असल्याचेही त्याने पुन्हा एकदा म्हटले. हे भाषण पीओजेके मधील रावलकोट जिल्ह्यातील हजीरा तहसीलच्या बहेरा गावात आयोजित कार्यक्रमादरम्यान देण्यात आले.

अबू मूसा कश्मीरी हा लष्कर-ए-तैयबाशी संबंधित जेकेयूएम (जम्मू-काश्मीर युनायटेड मूव्हमेंट) या संघटनेशीही जोडलेला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे आरोप पुन्हा एकदा बळकट झाले आहेत. नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) दहशतवादी कोणत्याही अडथळ्याविना अशा प्रकारची उघड भाषणे कशी देऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, अबू मूसा कश्मीरी याने यापूर्वीही अशा प्रकारची धमकीची विधाने केली आहेत. पहलगाम हल्ल्यापूर्वीही त्याने असेच वक्तव्य केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा व्हिडिओ केवळ एक भाषण नसून, मोठ्या दहशतवादी कटाचा इशारा मानला जात आहे.

दरम्यान, भारतीय सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांनी या व्हिडिओची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. व्हिडिओची तांत्रिक तपासणी, स्थानाची पडताळणी आणि दहशतवादी नेटवर्कचा मागोवा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशा भाषणांचा उद्देश तरुणांना कट्टरतेकडे वळवणे आणि पुन्हा एकदा दहशतवादाला खतपाणी घालणे हा असल्याचा यंत्रणांचा अंदाज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande