
छत्रपती संभाजीनगर, 14 जानेवारी (हिं.स.)।जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा कामाला लागली आहे. प्रशासनाने यापूर्वी ईव्हीएम मशिनची फर्स्ट लेव्हल चेकींग (एफएलसी) केली होती. परंतु सर्व मशिन महापालिका निवडणुकीसाठी देण्यात आल्याने आता नव्याने एलएलसी संदर्भातील कार्यवाही करावी लागणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, निवडणुकीसाठी सुमारे सहा हजार बॅलेट युनिट, तीन हजार कंट्रोल युनिट लागेल, असे सूत्रांनी नमूद केले.
प्रशासनाने प्राप्त ईव्हीएम मशिनची फर्स्ट लेव्हल चेकींगसंदर्भातील
प्रक्रिया देखील याआधीच पूर्ण केली होती. परंतु महापालिका निवडणूका घोषित झाल्यावर संबंधित ईव्हीएम महापालिकेकडे वर्ग करण्यात आल्या. दरम्यान, महापालिका निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पुन्हा कामाला लागले आहे. महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर त्या ईव्हीएम मशिनमधील मेमरी काढून मशिन पुन्हा जिल्हा परिषदेसाठी वापरल्या जाणार आहे. त्यासाठी नव्याने एफएलसी करावी लागेल. ६३ गट व पंचायत समितीच्या १२६ गणासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी नऊ तालुक्यात नऊ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले जातील. याबाबत पुढील आठवड्यात निर्णय होईल, असेही सूत्रांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis