लातूर : विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी धिरज देशमुखांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
लातूर, 14 जानेवारी (हिं.स.)। औसा तालुक्यातील टाका येथील विद्यार्थिनीचा जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या
विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी धिरज देशमुखांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट


लातूर, 14 जानेवारी (हिं.स.)। औसा तालुक्यातील टाका येथील विद्यार्थिनीचा जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आ. धिरज देशमुख यांनी लातूर जिल्हा पोलीस अधिक्षक यांची भेट घेवून याप्रकरणी पिडीत कुटूंबाला तत्परतेने न्याय मिळावा यासाठी विविध मागणीचे निवेदन दिले.

संबंधित शाळेतील मुलींच्या वसतिगृह व्यवस्थापनाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तपासासाठी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नेमावे. सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी शासन स्तरावर तातडीची कार्यवाही करावी.अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीस सहज जामीन मिळू नये यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता नेमावा. पीडित पाटोळे कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शासनाने आवश्यक ती सर्व तजवीज करावी, अशी ठाम मागणी यावेळी धिरज विलासराव देशमुख यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande