कन्नड नगरपरिषदेत राष्ट्रवादीच्या रंजना राठोड यांची उपनगराध्यक्षपदी निवड
छत्रपती संभाजीनगर, 14 जानेवारी (हिं.स.) | कन्नड नगर परिषद उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रंजना रवींद्र राठोड यांची निवड झाली आहे. स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीचे नेते संतोष कोल्हे, भाजपचे सुधाकर देवकर व काँग्रेसचे सय्यद अहेमद अली यांची
कन्नड नगरपरिषदेत राष्ट्रवादीच्या रंजना राठोड यांची उपनगराध्यक्षपदी निवड


छत्रपती संभाजीनगर, 14 जानेवारी (हिं.स.) | कन्नड नगर परिषद उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रंजना रवींद्र राठोड यांची निवड झाली आहे. स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीचे नेते संतोष कोल्हे, भाजपचे सुधाकर देवकर व काँग्रेसचे सय्यद अहेमद अली यांची तर गटनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष निकम यांची नियुक्ती करण्यात आली.

नगराध्यक्ष शेख फरीन बेगम अब्दूल जावेद यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या

विशेष सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार उपनगराध्यक्षपदासाठी पडली. राष्ट्रवादीच्या रंजना रवींद्र राठोड यांचा एकमेव अर्ज दाखल होता. सूचक म्हणून नगरसेविका सोनम गायकवाड, तर अलका जाधव अनुमोदक होत्या. रंजना राठोड यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद यांनी घोषित केले.

राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची युती असल्याने राष्ट्रवादीच्या संतोष कोल्हे व भाजपचे सुधाकर देवकर व काँग्रेसचे सय्यद अहेमद अली यांना स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. याबाबत अधिकृत घोषणा करून नियुक्ती जाहीर करण्यात आली. गटनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष निकम यांची तर काँग्रेसच्या गटनेतेपदी अयास शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande