
* मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक
मुंबई, 14 जानेवारी (हिं.स.) - भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन प्रकारासारखे आहे. मराठी भाषेबाबतचा आमचा दृष्टिकोन आम्ही आपले आपण असा अनेकवचनी आणि व्यापक असून त्यात मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता यांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं मराठी सकारात्मकता पसरवणारे आहे ज्यातून मराठी भाषा साहित्य संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार अपेक्षित आहे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. विरोधकांवर कडक शब्दांत टीका करताना चव्हाण यांनी मराठी भाषेचे राजकारणच करू नका कारण हा विषामृत असा खेळ नाही. विरोधकांची मराठी बाबतची भूमिका ही नकारात्मकतेने भरलेली असून ज्ञानेश्वर माऊलींच्या विश्वात्मके देवे या वैश्विक तत्त्वाशी त्यांची बांधिलकी नसल्याचे प्रतीक आहे असे ते म्हणाले.
भाजपा आणि मराठी माणूस या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीतच. वास्तविकपणे मराठी माणसाने स्थापन केलेल्या मातृसंस्थेची विचारधारा हीच भाजपाची विचारधारा असून घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या तीनही मराठी भाषिक थोर व्यक्तींच्या विचारांनी प्रेरित देश आणि समाज घडविण्याचे काम भाजपा वर्षानुवर्षे करत आहे असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी