आमदार आवताडेंनी पंढरपुरात भाजपचे सहा उमेदवार पाडल्याचा आरोप
सोलापूर, 14 जानेवारी (हिं.स.)पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी जातीचे राजकारण करण्यासाठी भाजपचे सहा ते सात उमेदवार पाडले, असा गंभीर आरोप भाजपच्या पराभूत उमेदवार अर्चना रानगट यांचे पती नवनाथ रानगट यांनी केला आहे. रानगट यां
आमदार आवताडेंनी पंढरपुरात भाजपचे सहा उमेदवार पाडल्याचा आरोप


सोलापूर, 14 जानेवारी (हिं.स.)पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी जातीचे राजकारण करण्यासाठी भाजपचे सहा ते सात उमेदवार पाडले, असा गंभीर आरोप भाजपच्या पराभूत उमेदवार अर्चना रानगट यांचे पती नवनाथ रानगट यांनी केला आहे. रानगट यांच्या या आरोपामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. रानगट हे भाजप नेते प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक आहेत.नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार श्यामल शिरसट यांचा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके यांनी सुमारे अकरा हजाराहून अधिक मताधिक्यांनी पराभव केला. भाजप उमेदवाराच्या पराभवानंतर भाजपमधील अंतर्गतवादाला तोंड फुटले आहे. शिवाय, आरोप-प्रत्यारोप ही सुरु झाले आहेत.भाजप उमेदवाराच्या पराभावावर भाष्य करताना आमदार आवताडे यांनी भगीरथ भालके व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करुन नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली असा आरोप केला होता. त्यानंतर पंढरपुरात तीव्र पडसाद उमटले आहेत. दरम्यान, भालके यांनी आमदार आवताडे यांच्या आरोपाचे खंडन करण्यापूर्वीच भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या पतीनेच आमदार समाधान आवताडे यांनी जातीयवादीचा छुपा प्रचार करुन भाजपच्या सहा ते सात उमेदवारांचा पराभव केल्याचा पलटवार करत निशाणा साधला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande