
नांदेड, 14 जानेवारी (हिं.स.)धर्मावाद येथील नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य यांची निवड करण्यात आली. उपनगराध्यपदी महेश (शंकर) बोलमवार यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे पत्नी संगीता बोलमवार नगराध्यक्ष तर पती महेश बोलमवार उपनगराध्यक्ष असा योग जुळून आला.
येथील नगरपरिषदेच्या सभागृहातउपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांच्या उपस्थितीत पार पडली. स्वीकृत सदस्यपदासाठी तीन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी दोन अर्ज अवैध ठरल्यामुळे डॉ. कमलकिशोर काकाणी यांचा अर्ज वैध ठरल्यामुळे त्यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली.
येथील नगरपरिषदेच्या सभागृहात उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांच्या उपस्थितीत पार पडली. स्वीकृत सदस्यपदासाठी तीन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी दोन अर्ज अवैध ठरल्यामुळे डॉ. कमलकिशोर काकाणी यांचा अर्ज वैध ठरल्यामुळे त्यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली. धर्माबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत मराठवाडा जनहित पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले. मजपाच्या नगराध्यक्षा व १५ नगरसेवक विजयी झाले. तर भाजपला केवळ सात जागेवरच समाधान मानावे लागले. बाकी प्रमुख पक्षांना खातेही उघडता आले नाही.
भाजपकडून डॉ. कमलकिशोर काकाणी, विष्णुकांत शिवनारायण व्यास या दोघांचे, तर मराठवाडा जनहित पार्टीकडून श्रीनिवास गणपतराव कंबलवाड यांचा एक अर्ज दाखल झाला होता.यात विष्णुकांत व्यास व श्रीनिवास कंबलवाड या दोघांचे अर्ज अवैध ठरल्यामुळे बाद झाले. तर डॉ. कमलकिशोर काकाणी यांचा अर्ज वैध ठरल्यामुळे डॉ. काकाणी यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis