
पुणे, 15 जानेवारी, (हिं.स.) - मुंबईत भाजप ९० जागा आणि शिवसेना ४० जागा मिळवेल. मुंबई, ठाणे पुण्यासह एकूण सहा महापालिकांमध्ये भाजपचा विजय निश्चित”, असा मोठा दावा भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मतदानाच्या दिवशीच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान करण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत ५.५ टक्के मतदान पुण्यात नोंदवण्यात आले आहे. अजून मतदान करण्यासाठी बराच वेळ शिल्लक असून, मतदानाची टक्केवारी आणखी वाढणार आहे. नेतेमंडळी देखील मतदान केंद्रांवर येत मतदानाचा हक्क बजावत आहेत. भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आणि त्यांनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु