
नागपूर, 16 जानेवारी (हिं.स.)।महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीत आज सकाळी आलेल्या कलानुसार भाजपने महापालिकेवर भक्कम वर्चस्व प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण ३८ प्रभागांतील १५१ पैकी १४३ जागांचे कल समोर आले असून त्यामध्ये भाजप तब्बल १०६ जागांवर आघाडीवर आहे.
काँग्रेस २९ जागांवर आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवसेना (शिंदे गट) १ जागेवर आघाडीवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १ जागेवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १ जागेवर आघाडी/विजयाच्या स्थितीत आहे. एमआयएमनेही ४ जागांवर आघाडी घेत आपली उपस्थिती नोंदवली आहे.
या निकालांमुळे नागपूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. दरम्यान, मतमोजणी अद्याप सुरू असून उर्वरित जागांचे अंतिम निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. मात्र सध्याचे कल पाहता नागपूर महापालिकेची सत्ता भाजपकडे जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून नागपूरच्या राजकारणात भाजपची पकड आणखी मजबूत झाल्याचे चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode