
बीड, 16 जानेवारी (हिं.स.)।
भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्ह्यातील नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आज बीड शहरातील कामाच्या संदर्भात अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला.
डॉक्टर क्षीरसागर यांनी नाळवंडी नाका ते नाळवंडी या डांबरी रस्त्याचे काम निकृष्ट व थातुरमातुर पद्धतीने सुरू असल्याबाबत ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सहकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली.
यावेळी उपस्थित असलेले डेप्युटी इंजिनिअर श्री. चोपडे व श्री. पोकळे यांना कामाच्या दर्जाबाबत स्पष्ट सूचना केल्या.
शासनाच्या निकषांनुसार व गुणवत्तापूर्ण पद्धतीने काम न झाल्यास सदर काम तात्काळ बंद पाडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी उध्दवराव मेहेत्रे, भाऊसाहेब सुरवसे, लक्ष्मीआई तांडाचे सरपंच स्वरूप राठोड (नाळवंडी), गणेश राऊत, जुजगव्हानचे सरपंच रवी गंगावणे, संजय बापू काळे, आत्माराम सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis