रत्नागिरी : कामथे उपजिल्हारुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’चा शुभारंभ
रत्नागिरी, 17 जानेवारी, (हिं. स.) : राज्य शासनाच्या ‘मेनोपॉज क्लिनिक’ या उपक्रमाचा प्रारंभ कामथे (ता. चिपळूण) येथील उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे मोठ्या उत्साहात झाला.महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या उपक्रमाची सुरुवात ही निश्चि
कामथे रुग्णालयात मेनॉपॉझ क्लिनिक


रत्नागिरी, 17 जानेवारी, (हिं. स.) : राज्य शासनाच्या ‘मेनोपॉज क्लिनिक’ या उपक्रमाचा प्रारंभ कामथे (ता. चिपळूण) येथील उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे मोठ्या उत्साहात झाला.महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या उपक्रमाची सुरुवात ही निश्चितच स्वागतार्ह बाब असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

रजोनिवृत्तीनंतर व चाळिशीनंतर येणाऱ्या मेनोपॉज कालावधीत महिलांना भेडसावणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ व क्लास वन अधिकारी डॉ. कांचन मदार यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केले होते. रजोनिवृत्तीची संकल्पना समजावून सांगताना महिलांनी या काळात स्वतःची कशी काळजी घ्यावी, याबाबत त्यांनी आत्मीयतेने मार्गदर्शन केले.

डॉ. कांचन मदार वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात नेहमीच प्रेरणादायी आणि दर्जेदार उपक्रम राबवत असून, आरोग्यविषयक उत्तम समुपदेशनासाठी त्या ओळखल्या जातात. त्यांचे कुशल नेतृत्व आणि नियोजन कौशल्य नेहमीच कौतुकास्पद ठरते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तालुका मुख्याधिकारी डॉ. ज्योती यादव, चिपळूणच्या उपनगराध्यक्षा रूपाली दांडेकर, फैरोजा मॅडम, नगरसेविका सफा गोठे, ॲड. स्मिता कदम, डॉ. चिन्मय जाधव, तसेच अनेक नामवंत डॉक्टर उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालयातील कुशल नर्सिंग स्टाफनेही या उपक्रमात मोलाचे योगदान केले.हे मेनोपॉज क्लिनिक दर बुधवारी सकाळी ११ ते २ या वेळेत कामथे येथे महिलांच्या सेवेत उपलब्ध राहणार आहे. चिपळूण परिसरातील तसेच विशेषतः ग्रामीण भागातील महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande