भंडारा- लाडक्या बहिणींचे रस्ता रोको आंदोलन
भंडारा, 17 जानेवारी (हिं.स.) भंडारा जिल्ह्यात आता लाडक्या बहिणीचे पैसे येत नसल्याने बहीणी आक्रमक झाल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग नागपूर नाका येथे महिलांनी रास्तारोको आंदोलन केलं आहे. बऱ्याच महिलांचे दोन महिन्यांचे पैसे आले नाही त्यामुळे त्यांनी स
भंडारा- लाडक्या बहिणींचे रस्ता रोको आंदोलन


भंडारा, 17 जानेवारी (हिं.स.) भंडारा जिल्ह्यात आता लाडक्या बहिणीचे पैसे येत नसल्याने बहीणी आक्रमक झाल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग नागपूर नाका येथे महिलांनी रास्तारोको आंदोलन केलं आहे. बऱ्याच महिलांचे दोन महिन्यांचे पैसे आले नाही त्यामुळे त्यांनी संबंधित विभागाला जाऊन या संबंधित माहिती घेतली असताना त्यांचे अर्ज बाद झाल्याचे कळले आहे. या महिला कुठल्याची नोकरीवर नसताना तुम्ही सरकारी नोकरीवर आहात असे सांगण्यात आले. निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस यांची मोठ मोठी घोषणा केली व आता अनेक महिलांचे अर्ज बाद होत असल्याने बहुतांश महिला रस्त्यावर येत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी मध्यस्थी करत महिलांची समजूत काढण्यात आली त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे...

--------------

हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar


 rajesh pande