भरजरी पैठणी विणकाम प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात आले
छत्रपती संभाजीनगर, 17 जानेवारी (हिं.स.) : महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळांतर्गत पैठणी केंद्र, संत ज्ञानेश्वर उद्यान रोड, पैठण यांच्या वतीने भरजरी पैठणी विणकाम प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक प्रशिक्षणार्थींकडून शुक
भरजरी पैठणी विणकाम प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात आले


छत्रपती संभाजीनगर, 17 जानेवारी (हिं.स.) : महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळांतर्गत पैठणी केंद्र, संत ज्ञानेश्वर उद्यान रोड, पैठण यांच्या वतीने भरजरी पैठणी विणकाम प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक प्रशिक्षणार्थींकडून शुक्रवार, दिनांक 30 जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी एकूण 30 प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येणार असून प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यांचा असेल. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना दरमहा 2,100 रुपये प्रशिक्षण भत्ता देण्यात येणार आहे.यापूर्वी प्रशिक्षणाचा लाभ न घेतलेले, किमान लिहिता-वाचता येणारे तसेच 18 ते 35 वर्षे वयोगटातील स्त्री व पुरुष उमेदवार प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. प्रशिक्षणार्थींची निवड समितीमार्फत मुलाखतीद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती पैठणी केंद्राच्या व्यवस्थापकांनी दिली आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande