अमरावतीत देशपांडेंचे तिकीट कापले आणि भाजपला फटका; अंबापेठ ‘ड’ जागेवर राष्ट्रवादीचा विजय
अमरावती, 17 जानेवारी (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३, अंबापेठ गोरक्षण प्रभागातील ‘ड’ या जागेवर भाजपला अंतर्गत नाराजीचा फटका बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रतन डेंडुले यांनी विजय मिळवला. भाजपकडून अॅड. प्रशांत देशपांडे
देशपांडेंची तिकीट कापली अन् भाजपला फटका; अंबापेठ ‘ड’ जागेवर राष्ट्रवादीचा विजय


अमरावती, 17 जानेवारी (हिं.स.)

अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३, अंबापेठ गोरक्षण प्रभागातील ‘ड’ या जागेवर भाजपला अंतर्गत नाराजीचा फटका बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रतन डेंडुले यांनी विजय मिळवला. भाजपकडून अॅड. प्रशांत देशपांडे हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यांनी मुलाखतही दिली होती. मात्र, भाजपच्या कोअर कमिटीने माजी नगरसेवक प्रणित सोनी यांना दुसऱ्यांदा संधी दिल्याने देशपांडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.ही नाराजी दूर करण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशपांडेंच्या निवासस्थानी भेट देत त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्याचे आश्वासन दिले होते. तरीही पक्षातील अंतर्गत मतभेद निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले. परिणामी, ज्या प्रणित सोनी यांच्यासाठी देशपांडेंची उमेदवारी कापण्यात आली, तेच सोनी पराभूत झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे रतन डेंडुले यांनी सोनी यांना पराभवाचा धक्का देत बाजी मारली.भाजपमधील अंतर्गत कुरबुरी, नाराजी आणि संघटनात्मक विसंवाद याचा थेट परिणाम निकालावर झाला, असे राजकीय निरीक्षण व्यक्त केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande