
जळगाव , 17 जानेवारी (हिं.स.)जळगाव शहारासह जिल्ह्यातील तापमानात वाढ दिसून आली. ढगाळ वातावरणामुळे ११ अंशाच्या घरात असलेले जळगावचे किमान तापमान १५ अंशावर जाऊन पोहोचले. सोबतच कमाल तापमानात देखील ३० अंशावर गेले. यामुळे थंडी अचानक कमी झाली आहे. मात्र आता तापमानात पुन्हा घसरण झाली जळगावचे किमान तापमान १५ अंश तर किमान तापमान ३०.५ अंश इतके नोंदविले गेले होते. जळगावचे किमान तापमान ३ ते ४ अंशांनी घसरल्याने १०.९ अंशावर पोहोचले. सोबतच कमाल तापमानातही घसरण झाली. दिवसाचे तापमान २९ अंशाखाली गेले. यामुळे रात्री थंडी जाणवली. मात्र दिवसा वातावरणातील गारवा कमी झाला असून दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका बसत आहे.गेल्या काही दिवसापासून राज्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसानंतर सावट असल्याने जळगावसह अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली होती. यामुळे थंडीचा कडाका कमी झाला. आता ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरण निवळताच राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होऊ लागले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर