इराणमधील हिंसक आंदोलनात आतापर्यंत किमान 5,000 जणांचा मृत्यू
तेहरान, 18 जानेवारी (हिं.स.)।इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे देशात मोठी खळबळ उडाली आहे. इराणी अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे, देशभरातील या आंदोलनांमध्ये आतापर्यंत किमान 5,000 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सुमारे 500 सुरक्षा कर्मचाऱ्या
इराणमधील हिंसक आंदोलनात आतापर्यंत किमान 5,000 जणांचा मृत्यू


तेहरान, 18 जानेवारी (हिं.स.)।इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे देशात मोठी खळबळ उडाली आहे. इराणी अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे, देशभरातील या आंदोलनांमध्ये आतापर्यंत किमान 5,000 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सुमारे 500 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सरकारने या घटनांमागे दंगखोर आणि शस्त्रसज्ज आतंकवाद्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे, ज्यांनी सामान्य नागरिकांना लक्ष्य केले.

इराणी अधिकाऱ्यांनुसार, हे प्रदर्शन 28 डिसेंबरपासून आर्थिक कमतरता, महागाई आणि बेरोजगारीविरोधात सुरू झाले होते. सुरुवातीला लोक रोजच्या अडचणींबाबत रस्त्यावर उतरे होते, पण दोन आठवड्यांत परिस्थिती जलदगतीने बिकट झाली आणि आंदोलनाला राजकीय रूप आले. अनेक शहरांमध्ये सरकारविरोधी घोषणा झाल्या आणि धार्मिक शासन समाप्त करण्याची मागणी करण्यात आली.

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आतापर्यंत जाहीर केलेले मृत्यूचे आकडे पूर्णपणे खरे आहेत. सरकारचा दावा आहे की अंतिम मृत्यूसंख्येत फार मोठा वाढ होण्याची शक्यता नाही. प्रशासनाने सांगितले की अनेक ठिकाणी हिंसा इतकी वाढली की परिस्थिती हाताबाहेर गेली आणि सुरक्षादलांना कडक उपाययोजना करावी लागली. इराणी नेतृत्व सतत या हिंसेसाठी परकीय शक्तींना जबाबदार ठरवत आहे. देशाचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह खामेनेई यांनी आरोप केला की या अशांततेमागे अमेरिका आणि इस्रायल यांचा हात आहे. त्यांनी हे देखील मान्य केले की या आंदोलनांमध्ये अनेक हजार लोकांचे प्राण गेले आहेत. सरकारचा दावा आहे की बाह्य शक्तींनी देशातील असंतोषाचा फायदा घेत परिस्थिती अधिक बिकट केली आहे.

इराणी अधिकाऱ्यांनुसार, ही हिंसा 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतरची सर्वात घातक मानली जात आहे. त्यानंतर देशाने अनेक वेळा विरोध प्रदर्शन पाहिले आहेत, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू या आधी कधीही झाला नव्हता. प्रशासनाने सुरक्षा वाढवली आहे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावले उचलण्याची माहिती दिली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की देशात शांतता बहाल करणे सर्वोच्च प्राथमिकता आहे. हिंसक घटना घडवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जात आहे. तसेच, सुरक्षादलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, जेणेकरून परिस्थिती आणखी बिकट होऊ नये.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande