पश्चिम आशियात अस्थिरता वाढवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न – इराण परराष्ट्र मंत्रालय
तेहरान, 18 जानेवारी (हिं.स.)।इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनांमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे संपूर्ण पश्चिम आशियात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत, इराणने अमेरिकेने लावलेले हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत की इराण अ
पश्चिम आशियात अस्थिरता वाढवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न – इराण परराष्ट्र मंत्रालय


तेहरान, 18 जानेवारी (हिं.स.)।इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनांमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे संपूर्ण पश्चिम आशियात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत, इराणने अमेरिकेने लावलेले हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत की इराण अमेरिकन लष्करी तळांवर हल्ल्याची तयारी करत आहे. इराणचे म्हणणे आहे की अमेरिका जाणीवपूर्वक पश्चिम आशियात तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ही माहिती इराणच्या सरकारी दूरदर्शन वाहिनिनी दिली आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बगाई यांनी शनिवारी सांगितले की अमेरिकेकडून लावलेले हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. त्यांनी म्हटले की या प्रदेशातील परिस्थिती अधिक बिघडवणे हीच अमेरिकेची नेहमीची नीती राहिली आहे. बगाई यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर फारसी भाषेत पोस्ट करून दावा केला होता की इराण अमेरिकन लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या पर्यायांवर काम करत असल्याचे संकेत देणारे अहवाल त्यांना मिळाले आहेत.

इस्माइल बगाई यांनी स्पष्टपणे सांगितले की इराणची सेना पूर्णपणे देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व जपण्यावर लक्ष केंद्रित करून आहे. त्यांनी इशारा दिला की इराणवर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला, तर त्याला ठोस आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल. याआधी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की सर्व पर्याय खुले आहेत आणि अमेरिकन ठिकाणांवर हल्ला झाल्यास अत्यंत कठोर शक्तीने उत्तर दिले जाईल.

अहवालानुसार, गेल्या महिन्यात इराणमध्ये आर्थिक अडचणींमुळे आंदोलनांना सुरुवात झाली होती, जी नंतर हिंसक बनली. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की आंदोलनांच्या काळात तोडफोड आणि हिंसाचार पसरवण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित व्यक्तींच्या विधानांमुळे परिस्थिती अधिक चिघळली. इराणचा आरोप आहे की या अस्थिरतेदरम्यान परकीय पाठबळ असलेल्या लोकांनी अनेक शहरांमध्ये हल्ले केले, ज्यात सुरक्षा दलांचे जवान आणि सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला तसेच सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.

इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांनी शनिवारी सांगितले की या दंगली आणि विध्वंसासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ते मुख्यतः जबाबदार मानतात. त्यांनी म्हटले की अशांतता पसरवणाऱ्यांपैकी काही लोकांना अमेरिकन आणि इस्रायली गुप्तचर संस्थांनी ओळखले, प्रशिक्षित केले आणि भरती केले होते. इराणने स्पष्ट केले आहे की तो कोणत्याही बाह्य दबाव किंवा धमक्यांपुढे झुकणार नाही आणि आपल्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande