बंगालमधून टीएमसीचा महाजंगलराज संपवणे गरजेचे- पंतप्रधान
कोलकाता , 18 जानेवारी (हिं.स.)।बंगालमधून “टीएमसीच्या महाजंगलराज” ला निरोप देऊन भाजपच्या सुशासनाची सुरुवात होणे अत्यावश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. ते विधानसभा निवडणुकीपूर्वी बंगाल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हुगळी जिल्ह्यातील सिंग
बंगालमधून टीएमसीचा महाजंगलराज संपवणे गरजेचे- पंतप्रधान मोदी


कोलकाता , 18 जानेवारी (हिं.स.)।बंगालमधून “टीएमसीच्या महाजंगलराज” ला निरोप देऊन भाजपच्या सुशासनाची सुरुवात होणे अत्यावश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. ते विधानसभा निवडणुकीपूर्वी बंगाल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथे आयोजित भाजपच्या परिवर्तन संकल्प रॅलीला संबोधित करताना बोलत होते.

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी उद्योग, रोजगार आणि घुसखोरी या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका करताना म्हणाले की देशात ज्या सरकारांनी विकास आणि गरीब कल्याणाच्या योजनांना अडथळे आणले, त्यांना जनतेकडून सातत्याने शिक्षा मिळाली आहे. दिल्लीमध्येही अशीच सरकार होती, जी केंद्र सरकारच्या योजना राबवू देत नव्हती; त्यामुळे दिल्लीतील जनतेने तिला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला. बंगालची जनता देखील आता निर्धाराने उभी राहिली असून, टीएमसीच्या निर्दयी सरकारला धडा शिकवून राज्यात भाजप सरकार आणणार आहे, जेणेकरून आयुष्मान भारतसारख्या केंद्र सरकारच्या योजना बंगालमध्येही लागू होतील.

पंतप्रधान म्हणाले की, हा प्रचंड जनसागर आणि लोकांचा उत्साह बंगालच्या नव्या कथेला सुरुवात झाल्याचे संकेत देत आहे. सर्वजण एका अपेक्षेने येथे आले आहेत—खरा परिवर्तन. बिहारप्रमाणेच, येथेही लोक १५ वर्षांच्या महाजंगलराजाला बदलू इच्छित आहेत. भाजपने बिहारमध्ये जंगलराजाला पुन्हा एकदा रोखले असून, आता बंगालही टीएमसीच्या महाजंगलराजाला निरोप देण्यासाठी सज्ज झाला आहे.

मोदी यांनी सांगितले की बंगालमध्ये प्रचंड क्षमता आहे—मोठ्या नद्या, विस्तीर्ण समुद्रकिनारे आणि सुपीक जमीन आहे. बंगालच्या प्रत्येक जिल्ह्यात काही ना काही विशेष आहे. भाजप प्रत्येक जिल्ह्याची ही ताकद अधिक बळकट करेल. भाजपचे सरकार सत्तेत आल्यास बंगालमध्ये पुन्हा एकदा उद्योगांचा विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कधी काळी बंगालची राजकीय दिशा आणि दशा बदलून टाकणाऱ्या सिंगूरच्या भूमीतून परिवर्तनाचा नारा देत पंतप्रधानांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारला सत्तेवरून हटवण्याचे आवाहन जनतेला केले. पंतप्रधानांनी स्थानिक नागरिकांना उद्योग आणि विकासाचे आश्वासन देत नव्या आशा निर्माण केल्या.

उल्लेखनीय म्हणजे, सुमारे दोन दशकांपूर्वी तत्कालीन डाव्या आघाडी सरकारविरोधात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने राबवलेल्या जमीन अधिग्रहणविरोधी आंदोलनामुळे टाटा समूहाची बहुचर्चित नॅनो कार प्रकल्प सिंगूरहून गुजरातला हलविण्यात आली होती. त्या घटनेनंतर अनेक वर्षांनी, निवडणुकीपूर्वी सिंगूरमध्ये जाहीर सभेला संबोधित करून मोदी यांनी राज्यातील राजकीय वातावरण तापवले.जाहीर सभेपूर्वी पंतप्रधानांनी सुमारे ८३० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. यामध्ये रेल्वे, बंदरे आणि जलवाहतूक क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश होता.

यावेळी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तीन नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यामध्ये हावडा–आनंद बिहार टर्मिनल अमृत भारत एक्सप्रेस, सियालदह–बनारस अमृत भारत एक्सप्रेस आणि संतरागाछी–तांबरम अमृत भारत एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधानांचा हा दोन दिवसांचा बंगाल दौरा विकास प्रकल्पांइतकाच राजकीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande