सरकारकडून ओबीसी आरक्षणाचे लचके तोडले गेले - प्रकाश शेंडगे
लातूर, 19 जानेवारी (हिं.स.)। कार्यकर्ता संवाद बैठक व पत्रकार परिषद राज्य शासनाने विविध जीआरच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचे लचके तोडण्याचे काम केले आहे, असा घणाघाती आरोप ओबीसी बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी ला
प्रकाश शेंडगे


लातूर, 19 जानेवारी (हिं.स.)। कार्यकर्ता संवाद बैठक व पत्रकार परिषद राज्य शासनाने विविध जीआरच्या माध्यमातून ओबीसी

आरक्षणाचे लचके तोडण्याचे काम केले आहे, असा घणाघाती आरोप ओबीसी बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी लातुरात पत्रकार परिषदेत बोलताना केला.

राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण या आघाडीची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले. एकंदर राजकीय परिस्थितीवरून राज्यात ओबीसी आरक्षणाचे वस्त्रहरण केले जात आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सत्ता हस्तगत करणे हाच एकम `व प्रभावी मार्ग आहे, असे सांगून प्रकाश शेंडगे म्हणाले की, आजपर्यंत राजकीय पक्षांनी केवळ मतांपुरता ओबीसी समाजाचा वापर करून घेतला गेला आहे. त्यांना आपण जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर उघडे पाडणार आहोत. एखादेवेळी जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले तरी त्याला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे शेंडगे यांनी सांगितले.

मनपा निवडणुकीत राज्यात यावेळी कधी नव्हे एवढा पैशाचा महापूर आल्याचे पाहायला मिळाला, ही बाब अतिशय चुकीची आहे. निवडणूक लढऊ इच्छिणाऱ्या ओबीसी कार्यकर्त्यांना एबी फॉर्मही मिळू दिले नाहीत. आमचे ओबीसीचे कार्यकर्ते पैशाने गरीब तरी त्यांच्यामागे आता ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाची फार मोठी ताकद असणार आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना आता आपला पक्ष घरपोहोच एबी फॉर्म उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आपला पक्ष उतरणार असून ज्या ठिकाणी आपला पक्ष उतरणार नाही, त्या ठिकाणी मूळ ओबीसी असणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी राहणार आहे. सध्या निवडणूक आयोग उमेदवारांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळू देत नाही, हा प्रकार कोणाच्या तरी दबावापोटी केला जात असल्याचा आरोप शेंडगे यांनी केला. राज्यातील सगळा ओबीसी समाज एकवटला तर त्याची टक्केवारी ८० टक्क्‌यांच्या घरात जाऊ शकते. हा समाज एकत्रित यावा, संघटित व्हावा यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसीच्या हक्कासाठी आता रणशिंग फुंकले आहे. आता सत्तेची प्राप्ती केल्याशिवाय थांबणार नाही, असेही प्रकाश शेंडगे यांनी ठणकावून सांगितले. याप्रसंगी ओबीसी बहुजन आघाडीचे महासचिव चंद्रकांत बावकर, खजिनदार जे.डी. तांडेल, राज्य संघटन सचिव पांडुरंग मिरगळ, अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande