
अकोला, 19 जानेवारी (हिं.स.)। अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने निवडणूक काळात उमेदवारांने केलेल्या खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत अकोला महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय येथील निवडणूक हिशोब खर्च कक्ष येथे सादर करणे अनिवार्य आहे. झोन निहाय/प्रभागनिहाय निवडणूक खर्चाचा हिशोब घेण्याकरिता एकुण 6 पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. कृपया संबंधीतांनी याची नोंद घेऊन अकोला महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाव्दारा करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे