रत्नागिरी : जिल्हा परिषद-पंचायत समितीसाठी २५ उमेदवारी अर्ज दाखल
रत्नागिरी, 19 जानेवारी, (हिं. स.) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी १०, तर पंचायत समिती निवडणुकीसाठी १५ उमेदवारी अर्
रत्नागिरी : जिल्हा परिषद-पंचायत समितीसाठी २५ उमेदवारी अर्ज दाखल


रत्नागिरी, 19 जानेवारी, (हिं. स.) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी १०, तर पंचायत समिती निवडणुकीसाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर अशा नऊ तालुका पंचायत समित्या आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच ५६ गट, तर पंचायत समित्यांच्या ११२ गण आहेत.

निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी एकेक अर्ज दाखल झाला होता. आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ११, तर पंचायत समितीसाठी १६ अर्ज दाखल झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande