
अकोला, 19 जानेवारी (हिं.स.)। आज दिनांक 19 जानेवारी रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्याव्दारे अकोला महानगरपाकेच्या डॉ.बाबासाहेब मुख्य सभागृह येथे मालमत्ता कर विभागाची कर वसुली बाबत आढावा बैठक घेतली.
या बैठकीत सर्वप्रथम मनपा आयुक्त यांनी आजपर्यंत करण्यात आलेल्या मालमत्ता कर वसुली बाबतचा आढावा घेतला. तसेच यावेळी, जास्त मोठे प्रमाणात थकबाकीदार असलेल्या मालमत्ता धारकांकडे भेटी देऊन थकित कराची वसुली करणे, जे मालमत्ता धारक भेटी देऊनही थकित कराचा भरणा करत नाही अशा मालमत्ता धारकांवर नियामानुसार कार्यवाही करणे, तसेच महानगरपालिकेचा उत्पन्नाच्या दृष्टीने मालमत्ता कर हे मुख्य स्त्रोत असून मनपाच्या उत्पन्नात वाढ व्हावी याकरिता शहरात नवीन बनलेल्या इमारतींवर कर आकारणी करणे आदींबाबत सुचना दिल्या.
तसेच मालमत्ता कर धारकांना कर भरेणे अधिक सोईचे व्हावे यासाठी शनिवार आणि आणि रविवार सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्यासाठी मनपा आयुक्त यांनी यावेळी सुचना दिल्या. या बैठकीत मनपा अतिरिक्त आयुक्त समेध अलोने, मनपा उपायुक्त विजय पारतवार, दिलीप जाधव, सहा.आयुक्त विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे, राजेश सरप, गजानन घोंगे, सर्व सहा.कर अधिक्षक आणि कर वसुली लिपिकांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे