परभणीत ऊर्स पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
परभणी, 19 जानेवारी (हिं.स.) : राष्ट्रीय एकात्मता आणि धार्मिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या सय्यद शाह तुराबुल हक साहेब ऊर्सानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस जिल्हा पो
A preparatory meeting was held for the Urs of Syed Shah Turabul Haq Saheb.


परभणी, 19 जानेवारी (हिं.स.) : राष्ट्रीय एकात्मता आणि धार्मिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या सय्यद शाह तुराबुल हक साहेब ऊर्सानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, महानगरपालिका आयुक्त मिलिंद नार्वेकर, वक्फ बोर्डाचे विशेष अधीक्षक खुस्रो खान, जिल्हा वक्फ अधिकारी इम्रान खान पठाण तसेच विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की सय्यद शाह तुराबुल हक साहेब ऊर्स धार्मिक व सामाजिक सौहार्दाचे प्रतीक असून दरवर्षी परभणी शहरात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. ऊर्साच्या दरम्यान मराठवाडा तसेच शेजारील राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.

बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित विभागांना ऊर्साच्या पूर्वतयारीसंदर्भात मार्गदर्शन केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, जातीय सलोखा कायम राखणे, तसेच प्रत्येक विभागाने सोपविण्यात आलेली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले. भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेणे आणि संपूर्ण ऊर्स शांततेत पार पाडणे हाही त्यांचा मुख्य संदेश होता.

पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवावा, गर्दीचे योग्य नियोजन करावे आणि कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेसाठी संबंधित विभागांनी दक्षता बाळगावी, असेही सांगण्यात आले. सर्व विभागांनी आवश्यक सेवा-सुविधा तत्परतेने उपलब्ध करून द्याव्यात. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज वितरण कंपनीने खबरदारी घ्यावी, अग्निशमन व सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, तसेच अन्नविषबाधेसारख्या आपत्कालीन घटनांकडे विशेष लक्ष द्यावे, असेही निर्देश दिले गेले.

बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, 2 ते 10 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सय्यद शाह तुराबुल हक साहेब ऊर्सानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande