
लातूर, 19 जानेवारी (हिं.स.)मराठवाडा साहित्य परिषद, शाखा अहमदपूर आणि रोटरी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कवी महेंद्र खंडागळे लिखित 'भास-आभास' या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा बुधवार, २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील महात्मा गांधी महाविद्यालयासमोर असलेल्या संस्कृती मंगल कार्यालयात पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर हे भूषवणार असून, त्यांच्या उपस्थितीत या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. फ. म. शहाजिंदे लाभले आहेत. तसेच, ज्येष्ठ कवयित्री प्रा. ललिता गादगे यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती राहणार आहे.मराठवाडा साहित्य परिषद आणि रोटरी परिवार, अहमदपूर यांच्या वतीने या साहित्यिक सोहळ्यास सर्व रसिक श्रोत्यांनी आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis