उमर खालिदला जामिनावर सोडण्याची अमेरिकेतील 8 खासदारांची मागणी
नवी दिल्ली, 02 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेतील आठ खासदारांनी दिल्ली दंगलीच्या प्रकरणातील आरोपी उमर खालिद याला जामिनावर मुक्त करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी अमेरिकन खासदारांनी अमेरिकेत नियुक्त भारतीय राजदूतांना पत्र लिहिले आहे. या पत्रात उमर खाल
उमर खालिदला जामिनावर सोडण्याची अमेरिकेतील आठ खासदारांची मागणी


नवी दिल्ली, 02 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेतील आठ खासदारांनी दिल्ली दंगलीच्या प्रकरणातील आरोपी उमर खालिद याला जामिनावर मुक्त करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी अमेरिकन खासदारांनी अमेरिकेत नियुक्त भारतीय राजदूतांना पत्र लिहिले आहे. या पत्रात उमर खालिदला जामीन मंजूर करण्यासोबतच दिल्ली दंगल प्रकरणाची निष्पक्ष आणि वेळेत सुनावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असलेला उमर खालिद हा २०२० मधील दिल्ली दंगल प्रकरणात कट रचल्याचा आरोपी असून, अटकेपासून तो गैरकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा अंतर्गत गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे. खटल्याची सुनावणी सुरू होण्यापूर्वीच उमर खालिदला इतक्या दीर्घ काळ तुरुंगात ठेवण्यात आल्याबद्दल अमेरिकन खासदारांनी चिंता व्यक्त केली आहे. या पत्रात अमेरिकन खासदारांनी उमर खालिदच्या प्रकरणाची सुनावणी तातडीने सुरू करावी आणि त्याला जामिनावर सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

अमेरिकन खासदारांनी पत्रात भारतीय लोकशाही संस्थांप्रती आदर व्यक्त केला असला, तरी सुनावणी सुरू न करता खालिदला इतक्या काळ कोठडीत का ठेवण्यात आले आहे, यावर प्रश्न उपस्थित केला आहे. हे आंतरराष्ट्रीय कायदेशीर नियमांच्या विरोधात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, सुनावणी न करता आरोपीला दीर्घकाळ नजरकैदेत ठेवण्याची परवानगी देणाऱ्या कायद्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. जिम मॅकगव्हर्न यांनी सांगितले की, त्यांनी अलीकडेच वॉशिंग्टनमध्ये उमर खालिदच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.हे पत्र डेमोक्रॅट खासदार जिम मॅकगव्हर्न आणि जेमी रस्किन यांच्या नेतृत्वाखाली लिहिण्यात आले आहे. मॅकगव्हर्न आणि रस्किन यांच्यासह हे पत्र लिहिणाऱ्या खासदारांमध्ये डेमोक्रॅट खासदार क्रिस व्हॅन होलेन, पीटर वेल्च, प्रमिला जयपाल, जॅन शाकोव्स्की, रशीदा तालिब आणि लॉयड डॉगेट यांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande