परभणीत अवैध वाळूच्या टिप्परसह चालक पोलिसांच्या ताब्यात, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
परभणी, 21 जानेवारी (हिं.स.)। परभणी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मांगणगाव परिसरात अवैध रेती वाहतुकीच्या टिप्परसह चालकास ताब्यात घेतल्याची घटना घडली. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांचे सहाय्यक पोलिस नि
परभणीत अवैध वाळूच्या टिप्परसह चालक पोलिसांच्या ताब्यात, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त


परभणी, 21 जानेवारी (हिं.स.)।

परभणी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मांगणगाव परिसरात अवैध रेती वाहतुकीच्या टिप्परसह चालकास ताब्यात घेतल्याची घटना घडली. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामीण पोलिसांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन राजगुरू, सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित अडके, पोलिस हवालदार हाके, पोलिस नाईक धबडे, पोलिस चालक पवार असे मिळून अवैधधंद्याची माहिती काढण्याकामी मांगणगाव परिसरात आले असता संबरकडून मांगणगावच्या दिशेने एक अवैध रेती वाहतुकीचा टिप्पर येत असल्याच्या माहितीवरून पथकाने तात्काळ कारवाई केली असता. मांगणगाव परिसरातील पुलाजवळ एका टिप्पर वाहनास थांबविले असता त्यात अंदाजे दीड ब्रास वाळू मिळून आली. चालकास विचारपूस केली असता त्याने संतोष सोनाजी वाकोडे(वय १९) रा. वांगी रस्ता, करीमनगर परभणी असे सांगितले. त्याच्याकडे रेती वाहतुकीचा परवाना मिळून आला नसल्याने टिप्पर चालक व मालक संतोष वाकोडे यास ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत अवैध वाळू वाहतुकीचा टिप्पर क्र - एमएच ०५ एएम ०३९९ आणि त्यातील अंदाजे दीड ब्रास वाळू असा मिळून एकूण ५ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टिप्पर चालक - मालक संतोष सोनाजी वाकोडे यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायद्यान्वये परभणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जीवन राजगुरू हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande